औरंगाबाद- युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन मला तीनच महिने झाले. या काळात तरुणांशी संवाद साधतांना मला हे लक्षात आली की, काँग्रेस अतिसज्जनपणा मुळे अडचणीत आली. सत्तेची मस्ती आमच्यात चढली होती म्हणून काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला अशी स्पष्ट कबुली अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
सत्यजित तांबे यांनी आज औरंगाबादेत दिली. सोच से सोच की लडाई या
चर्चासत्रानिमित्त ते युवकांशी संवाद साधतांना बोलत होते.
देशात अराजकता माजली आहे. एका विशिष्ठ विचारसरणीचा प्रभाव देशातल्या तरुणाईवर पडत आहे. लोकशाही धोक्यात तरुणाईचे संघटन करून त्यांना या परिस्थिती जाणीव करून देण्यासाठी युवक काँग्रेस आणि समविचारी विविध पक्ष संघटनांच्या वतीने सोच से सोच की लडाई या चर्चासत्राचे आयोजन आयएमए सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी विचारवंत डॉ. उल्हास उढाण, राजेश मुंढे, संदेश कांबळे, यांनी आपले मनोगत मांडले. आज जी परिस्तिथी निर्माण झाली आहे ती यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती. त्यामुळे सोच से सोच की लडाई यासारखे चर्चासत्र देशभरात घेणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी यावेळी चर्चासत्रात मांडले.
व्यासपीठावर युवक काँग्रेस सरचिटणीस प्रतिभा रघुवंशी, सचिव मनीष चौधरी, सिल्लोड चे नगराध्यक्ष समीर सत्तार, आदींची उपस्तीती होती. यावेळी पुढे
बोलतांना श्री तांबे म्हणाले की, राहुल गांधी हे
लोकशाहीवर प्रचंड विश्वास असणारे नेतृत्व आहेत. भाजप आणि शिवसेना या दोन्ही
पक्षामुळे देशात असंतोष निर्माण झाला. राजकीय साक्षरता देशभरात आली पाहिजे तेव्हाच
लोकशाही मजबूत होईल. राजकारणात एक भूमिका प्रत्येक युवकांची असली पाहिजे. धर्म ही
प्रत्येकाची वयक्तिक बाब आहे. ती आपल्या घरापर्यंतच असायला हवी. त्यामुळे आम्ही
विचारानेच विचारांची लढाई लढणार आहोत म्हणून सोच से सोच की लडाई ही मोहीम देशभरात
सुरू करण्यात आली आहे. लोक ज्याला स्वीकारतील तो पंतप्रधान होऊ शकतो मात्र तो जर
लोकशाहीवर गदा आणत असेल तर तो कोणतेही नेतृत्व करू शकत नाही. राजकारणातील उमेदवार
हा लग्नातल्या नवरदेवसारखा असतो. आज होत असलेल्या देशातील विचारसरणीमुळे फूट पडत
असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. रात्र
कमी आणि सोंग फार अशी अवस्था आता युवक काँग्रेस ची असून आगामी काळात युवक काँग्रेस
अधिक सक्षम आणि संघटनात्म बांधणी करण्यासाठी कला, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांना
सहभागी करून घेत अधिक प्रभावीपणे आगामी काळात काम करेल असा विश्वास सत्यजित तांबे
यांनी यावेळी बोलतांना केला.
















